🕒 1 min read
Pravin Darekar | मुंबई : अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे खूप नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्याकरीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावरून अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यानंतर आता भाजप (BJP) नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी देखील हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे यांना उशिरा का होईना शहाणपण सुचलं. शेतकऱ्यांना भेटायला त्यांना आधी भेटायला वेळ नव्हता. मात्र, आता त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जावस वाटलं, असं प्रविण दरेकर म्हणाले. तसेच जेव्हा कोकणात तौक्ते वादळ आले तेव्हा आम्ही उद्धव ठाकरे यांना भेटलो. आता नाईलाज म्हणून ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. त्यांनी अशा प्रकारे भेट द्यायला हवी शिवाय त्यांच्या या दौऱ्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आभार मानले पाहिजेत, असं देखील ते म्हणाले आहेत.
अब्दुल सत्तार यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी मी त्यांच्या दौऱ्यातील मिनीट टू मिनीट कार्यक्रम पाहिला त्यानंतर असं दिसून आलं की 24 मिनिटांसाठी ते शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत. आता यावेळेत ते किती पाहातील, काय पाहातील, किती ओला दुष्काळ पाहातील, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अब्दुल सत्तारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
सत्तार म्हणाले, मला हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता परतीचा पाऊस संपलेला आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने दौरा काढला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानेल. किमीत कमी यंदा तरी अडीच वर्षानंतर त्यांचा दौरा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येऊ लागला, याबद्दल त्यांना धन्यवादच द्यावे लागतील. 22-24 मिनिटं का असेना पण आले पाहणी करतील आणि ज्या सूचना ते मांडतील त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चितच विचार करतील.
महत्वाच्या बातम्या :
- Gold Silver Price | दिवाळीपूर्वी सोने-चांदी चे दर झाले स्वस्त, जाणून घ्या
- Nitesh Rane | “…त्यापुर्वी आदित्य ठाकरेंनी पुरुषाच्या आवाजात बोलून दाखवाव”, नितेश राणेंची बोचरी टीका
- Abdul Sattar | “शिंदे गटातील 22 आमदार नाराज म्हणणं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने”; अब्दुल सत्तार यांचा खोचक टोला
- IND vs Pak | भारताची भेदक गोलंदाजी! पाकिस्तानच्या १० ओव्हरमध्ये २ बाद ६० धावा
- India vs Pakistan । सूर्यकुमार यादवबाबत पाकिस्तानच्या माजी खेळाडूच मोठं वक्तव्य, म्हणाला….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
