🕒 1 min read
(Uddhav Thackeray) मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालय यासंदर्भात काय निर्णय देणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी संपत्तीची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, असं उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत म्हंटल आहे.
न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला आणि आर एम लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी होईल. उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे असूनही कारवाई होत नाही, असा आरोप करत या केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालय, सीबीआय, मुंबई पोलीस आयुक्त, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे या सर्वांना प्रतिवादी करण्यात यावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आलेली आहे.
दादरमध्ये वास्तव्यास असलेल्या गौरी भिडे (Gauri Bhide) आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. तसेच गौरी भिडे यांच्या आजोबांचा ‘राजमुद्रा’ हा प्रकाशन छापखाना ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीच्या असलेल्या ‘प्रबोधन’ छापखान्याच्या शेजारीच होता. ‘ना खाऊंगा ना खाणे दुंगा’ या मोदींच्या आवाहनानं प्रेरित होत त्यांनी ही याचिका असल्याचं सांगितलं आहे.
ठाकरे कुटुंबाने कशाप्रकारे भ्रष्टाचार केला आणि बेहिशेबी मालमत्ता जमा केली हे सांगणारी कागदपत्रे याचिकेसह जोडण्यात आली आहेत. कोणत्याही राजकीय पक्षात स्वत: अधिकृत पद धारण करणे, हे उत्पन्नाचे कायदेशीर स्त्रोत असू शकत नाही. त्याचप्रमाणे, कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपदाची घटनात्मक पदे धारण करणे हे देखील उत्पन्नाचे साधन नाही. उद्धव, आदित्य आणि रश्मी यांनी कधीही कोणत्याही विशिष्ट सेवा, व्यवसाय आणि व्यवसाय त्यांच्या उत्पन्नाचे अधिकृत स्त्रोत उघड केले नाहीत. तरीही त्यांच्याकडे मुंबईसारख्या शहरात आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, गौरी भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उसाचं न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bachhu Kadu | “महाठग खिसे कापणारे आणि…”; बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर सडकून टीका
- Uday Samant | “काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो…”, उदय सामंत यांचा सूचक इशारा
- Bhaskar Jadhav | भास्कर जाधव यांच्या घरावर आज्ञात इसमानांनी केली दगडफेक
- ST. Employees | एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून ‘इतक्या’ हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर
- Eknath Shinde | दिग्गज नेत्यांचा आदेश धुडकावत शिंदे गटाने भाजपचा महामंत्री फोडला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
