Share

Eknath Shinde | “सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोमवारी शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या
दोन्ही गटांनी आयोगासमोर आपल्या पक्षाचं नाव आणि त्यासोबत तीन चिन्ह सादर केली होती. त्यानूसार सोमवारी रात्री आयोगाने निर्णय जाहीर केला, परंतू त्यामध्ये ठाकरे गटाला चिन्ह आणि नाव दिलं गेलं. शिंदे गटालाही नाव दिल, मात्र शिंदे गटाने सादर केलेले तीनही चिन्ह अमान्य असल्यामुळे त्यावेळी आयोगाने कोणतही चिन्ह दिलं नाही. त्यामुळे शिंदे गटाला काल म्हणजेच मंगळवारी सकाळी तीन नवीन चिन्ह सादर करायची होती. सादर केलेल्या चिन्हांमधून निवडणूक आयोगाने काल रात्री शिंदे गटाचे चिन्ह जाहीर केले. शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे. आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार. हॅशटॅग बाळासांहेबांची शिवसेना, असं ट्विटमध्ये म्हटलं गेलं आहे. यासोबतच त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. त्यामध्ये गाटाचे नाव,मिळालेले ‘ढाल-तलवार’ चिन्ह आणि बाळासाहेबांचा फोटो असल्याचं पाहायला मिळतं आहे.

शिंदे गटाने निवडणूक आयोगाला चिन्ह पाठवण्यासाठी दोन मेल केले होते.दोन्ही मेलमध्ये प्रत्येकी तीन चिन्ह असल्याची माहीत समोर आली आहे. एका मेलमध्ये ढाल-तलवार, तळपता सूर्य आणि पिंपळाचं झाड हे चिन्ह होते.तर रिक्षा, शंख आणि तुतारी असे चिन्ह दुसऱ्या मेलमधून पाठवण्यात आले होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव दिलं असून,’मशाल’ हे चिन्ह दिलं आहे.त्यामुळे आता आगामी पोट निवडणूकीमध्ये मशाल विरूद्ध ढाल-तलावर असं चित्र पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!