🕒 1 min read
पुणे : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल पुण्यामध्ये कांदिवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्या बाबत आक्षेपार्य ट्विट केलं होतं. या विरोधात पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तक्रार केली. यानंतर अतुल भातकर यांच्या विरोधात पुण्यातील सायबर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
अतुल भातखळकर यांचं ट्विट-
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची जुलै महिन्यात ईडी चौकशी झाली होती. त्यापूर्वी सोनिया गांधींना समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र, कोरोना संसर्गामुळे झाल्यामुळे सोन्या गांधींनी चौकशी हजर राहण्यास नकार दर्शवला होता. त्यावरच भातखळकर यांनी सोनिया गांधींवर “कोरोनाचा ईडी व्हेरीयंट” म्हणत भातखळकर यांनी ट्विट केलं होतं.
दरम्यान, अतुल भातखळकर यांनी केलेल्या ट्विटवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत संदीप भुजबळ यांनी तक्रार केली. भातखळकर यांनी केलेल्या ट्विट नंतर त्यांच्यावर अनेक काँग्रेस नेत्यांनी टीका-टिप्पणी देखील केली होती.
महत्वाच्या बातम्याः
- Education | आता पुस्तकांनाच जोडणार वह्यांची पाने, शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय
- Uddhav Thackrey | “परवानगी मिळो अथवा न मिळो, दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार”, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
- Amit Shah। अमित शहांच्या रडारवर आता बिहार; स्वत: हातात घेतली सुत्रे
- BJP । “ज्यांना 100 आमदार निवडून आणता आले नाहीत, त्यांनी…”; बावनकुळेंचा पवारांना टोला
- Mumbai । सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
