🕒 1 min read
मुंबई : शिवाजी महाराज पार्क दसरा मेळावा कोण घेणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र शिवसेनेला अद्याप शिवतीर्थावर परवानगी मिळालेली नाही. मुंबई पालिकेने शिवसेनेला परवानगी देण्याचा निर्णय राखून ठेवला असल्याचं समोर आलं आहे. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणाः
शिवसेनेच्या दसरा मेळाव्या करीता शिवाजी पार्कवर परवानगीसाठी दोनदा पत्र देऊन ही पालिकेने अर्ज निर्णय होल्डवर ठेवला आहे. त्यामुळे परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
40 आमदारांसह बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर त्यांचा दावा केला. त्यामुळे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट, अशे दोन गट पडले आहेत. आता शिवसेना कोणाची या प्रश्नानंतर शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा कोणाचा असा प्रश्न समोर येत आहे.
महापालिकेची परवानगी अडचणी ठरू शकते मात्र त्याबाबत नंतर बघता येईलः
दरम्यान, राज्यातील तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी अडचणीची ठरू शकते मात्र त्याबाबत नंतर बघता येईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. सोमवारी विश्वबंधु परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्या निमीत्ताने पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Amit Shah। अमित शहांच्या रडारवर आता बिहार; स्वत: हातात घेतली सुत्रे
- BJP । “ज्यांना 100 आमदार निवडून आणता आले नाहीत, त्यांनी…”; बावनकुळेंचा पवारांना टोला
- Mumbai । सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
- Shivsena । “ठणठणीत अर्थव्यवस्था दमली, खणखणीत रुपयाही खंगला”; शिवसेनेने सांगितली ‘दमलेल्या’ सरकारची कहानी
- Sharad Pawar | ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू; पवारांचा थेट केंद्र सरकारवर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
