🕒 1 min read
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत सातत्याने वक्तव्ये येत आहेत. या सामन्याबाबत प्रत्येकजण आपापली मते मांडत आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद याने आपल्या संघाला दोन भारतीय खेळाडूंपासून मोठा धोका असल्याचे सांगितले आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यापासून पाकिस्तानी संघाला जास्त धोका असल्याचे त्याने म्हटले आहे. याशिवाय त्याने हार्दिक पांड्याचे देखील नाव घेतले आहे.
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. दोन्ही संघ आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. दुसरीकडे, आकिब जावेदचा विश्वास आहे की, भारतीय संघाचा अव्वल क्रमांक लवकरच पॅव्हेलियनमध्ये पाठवला तरच त्यांचा पराभव होऊ शकतो. तसेच शाहीन आफ्रिदीच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला थोडा दिलासा मिळेल.
जेव्हा कोहली दडपणाखाली येतो-
आकिब जावेदने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना पाकिस्तानसाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ टीव्हीवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, ‘भारतीय संघ पहिल्या फळीतील विकेट पडली तरच हारेल. कारण जेव्हा कोहली दडपणाखाली येतो तेव्हा त्याला फॉर्ममध्ये येणे कठीण होईल. मात्र, पाकिस्तानला वरच्या फळीतील रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यापासून मोठा धोका आहे आणि हार्दिक पांड्या खालच्या फळीत धोकादायक ठरू शकतो.”
सूर्यकुमार यादव मैदानात सर्वत्र खेळतो-
आकिब जावेद पुढे म्हणाला, “सूर्यकुमार यादव हा असा फलंदाज आहे जो मैदानात सर्वत्र खेळतो. अशा परिस्थितीत एखाद्या गोलंदाजाला त्याला बाहेर काढावे लागते कारण आपण त्याला जास्त काळ धरून ठेवू शकत नाही.”
सूर्यकुमार यादवचा फॉर्म खूपच चांगला-
सूर्यकुमार यादवचा अलीकडचा फॉर्म खूपच चांगला आहे पण त्याला पाकिस्तानविरुद्ध अनेक सामने खेळण्याचा अनुभव नाही. T20 विश्वचषकात तो पाकिस्तानविरुद्ध फक्त एकच सामना खेळला होता ज्यात तो फ्लॉप ठरला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Rajan Salvi | राजन साळवी आणि भाजप मंत्री रविंद्र चव्हाणांमध्ये बंद दाराआड भेट, पुन्हा चर्चांना उधाण
- Aditya Thackrey | शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळावा वरुन आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले…
- Asia cup 2022 : India vs Pakistan सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदीची विराट कोहलीसाठी प्रार्थना, पाहा VIDEO
- Devendra Fadanvis | “उद्धव ठाकरे यांची अवस्था अशी झाली आहे की…”, संभाजी ब्रिगेड सोबत युती केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा टोला
- Farhan Akhtar | फरहान अख्तरने आपली ‘जीवनसाथी’ शिबानी दांडेकर हिला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
