🕒 1 min read
यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अमरावती येथे दहा एप्रिल रोजी विभागीय आढावा घेण्यासाठी येणार आहेत. या पाश्वर्भूमीवर यवतमाळमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. अमरावती विभागीय समन्वयक संजय खोडके यांच्या नेतृत्वात ही बैठक आज दुपारी तीन वाजता होणार आहे.
त्यापूर्वीच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत आहे. काही कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्ष हटाव राष्ट्रवादी काँग्रेस बचाव, अशा प्रकारचे पोस्टर शहरातील विविध भागांत लावण्यात आले. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. हे पोस्टर आता कोणी लावले? जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर हे जिल्हाध्यक्ष म्हणून कुणाला नको आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीची विभागीय बैठक आज दुपारी तीन वाजता आहे. या बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाध्यक्षांना विरोध करणारे सक्रिय झाले. त्यामुळं या बैठकीत हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –

