🕒 1 min read
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी यासंदर्भात घोषणा केली होती. आजपासून मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे भोसलेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी भाजपचे विधान परिषदेचे नेते प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली.
यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, आम्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. मराठा समाजाने अंतर्गत राजकारण बाजूला ठेवावे. राजकारण नव्हते तेव्हा मोठी आंदोलनं झाली. आम्हीही भूमिपुत्र आहोत. केवळ राजकारणी म्हणून आलो नाही. एकोप्याने आंदोलन करा, राजकारणाचे बळी पडू नका. येत्या अधिवेशनात आम्ही मराठा अक्षणाचा मुद्दा लावून धरु, असे आश्वासन यावेळी प्रविण दरेकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
महत्वाच्या बातम्या:
IND vs SL: भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी २० सामना आज रंगणार
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा गंभीर इशारा ; म्हणाले…
“रोहितने भर मैदानावर खेळाडूवर ओरडणे बंद करावे” विराट कोहलीच्या प्रशिक्षकांचा सल्ला
‘भाजपकडून सत्तेसाठी यंत्रणांचा वापर’; बाळासाहेब थोरातांचा आरोप
रोहित कि विराट आवडता खेळाडू कोण सांगितल्यावर आलीया भट होतेय ट्रॉल


