Share

IPL AUCTION 2022: मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी लागणार ‘या’ खेळाडूंवर बोली

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरू : आयपीएलच्या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी अनेक मोठ्या नावांवर कोटींची बोली लागली आहे. ज्यात ईशान किशन , दिपक चहार , हर्षल पटेल , आवेश खान , शार्दूल ठाकूर या खेळाडूंवर १० कोटीपेक्षा जास्त खर्च करण्यात आले. पहिल्या दिवशी ३०० कोटींची उलाढाल झाल्यानंतर आता काही वेळातच दुसऱ्या दिवसाच्या ऑक्शनला सुरुवात होणार आहे. १८ सेट पूर्ण झाल्यावर स्पीड ऑक्शनलाही सुरुवात होणार आहे.

६०० नावांच्या शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडू ज्यांना संघांनी विचारले नाही त्यावर बोली लावली जाणार नाहीत. वेळेची बचत करण्यासाठी त्यांचा समावेश स्पीड ऑक्शन मध्ये केला जाईल.९८ ते १६१ पर्यंतचे खेळाडूंवर दुपारच्या जेवणापूर्वी बोली लावली जाईल . दुपारच्या जेवणानंतर, १६२ ते ६०० पर्यंतचे खेळाडू आणि विक्री न झालेले सर्व खेळाडू स्पीड ऑक्शनमध्ये एकत्र केले जातील. पहिल्या दिवशी डेव्हिड मिलर, सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, अनमोलप्रीत सिंग, मोहम्मद अझरुद्दीन, एन. जगदीसन, विष्णू सोलंकी, विष्णू विनोद , रजत पाटीदार, सॅम बिलिंग्ज, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड , शकीब अल हसन, मोहम्मद नबी , उमेश यादव, अमित मिश्रा, आदिल रशीद, इम्रान ताहीर, मुजीब झद्रान, अॅडम झाम्पा, सी. हरी निशांत, संदीप लामिछाने, एम. सिद्धार्थ हे खेळाडू अनसोल्ड राहिले होते.

तर दुसऱ्या दिवशी आरोन फिंच , मार्नस लॅबुशेन, डेविड मलान , एडन मार्कांम, इऑन मॉर्गन , चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे , मनदीप सिंग, सौरभ तिवारी , डॉमिनिक ड्रेक्स , शिवम दुबे , के. गौथम , मार्को जॅन्सन, ख्रिस जॉर्डन , लियाम लिव्हिंगस्टोन, जेम्स नीशम , विजय शंकर , ओडियन स्मिथ, जयंत यादव , सय्यद खलील अहमद, दुष्मंता चमीरा, शेल्डन कॉट्रेल, ईशान शर्मा , एस श्रीसंत , जयदेव उनाडकट , कुलदीप यादव या खेळाडूंवर बोली लागली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!