🕒 1 min read
मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
असे असतांनाच आता राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच आता एक भावनिक फेसबुक पोस्ट शेअर करत कर्जत- जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी देखील आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. फेसबुक पोस्ट मध्ये रोहित पवार म्हणाले आहेत की,’तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत’, असे रोहित म्हणाले आहेत.
https://www.facebook.com/220852055045211/posts/1345145459282526/?d=n
दरम्यान, आज(४ जाने.)सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी देखील ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये केजरीवाल म्हणाले आहेत की,’मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. सौम्य लक्षणं आहेत. घरातच स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावं आणि चाचणी करुन घ्यावी,’ असे ते म्हणाले आहेत. आत्तापर्यंत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड,आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर,राधाकृष्ण विखे-पाटील आदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- उन्मेष पाटील यांच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले,’हे तर चिल्लर…’
- …तर मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल- इकबाल चहल
- अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
- प्रवीण दरेकरांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, चित्रा वाघ यांचा टोला
- अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रियाला कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
