Share

दुखापतग्रस्थ मोहम्मद शमीच्या जागी लागणार ‘या’ युवा खेळाडूची वर्णी

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : कालच्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात अवघ्या 15 धावात भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला, शिवाय अवघ्या ३६ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हताश शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळं बाहेर गेला आहे. आगामी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांच्या मते मोहम्मद सिराज मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत पदार्पण करु शकतो. सिराजनं सराव सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती.

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशा केली. याच दरम्यान पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली आणि तो रिटायर्ट हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. शमीला झालेली दुखापत हा भारतीय संघासाठी मोठा झटका आहे. भारतीय संघ आता उमेश यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वेगवान गोलंदाजीसाठी अवलंबून आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!