🕒 1 min read
रत्नागिरी: कोरोनाचे वाढते रुग्ण प्रमाण, निसर्ग वादळाचा तडाखा, पावसाळी कामे, शेतकरी मोबदला, या सर्व गोष्टींवरून भाजपाचे नेते निलेश राणे हे महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर वारंवार निशाणा साधत असल्याचे दिसत आहे. आज निलेश राणेंनी, एकही क्षेत्र नाही ज्यात ठाकरे सरकारने समाधानी काम केलं आहे, असे म्हणत पुन्हा घणाघात केला आहे.
यावेळी त्यांनी चक्क युवासेनेच्या शहरअध्यक्षानेच मांडलेली व्यथा ट्विटरवर शेअर केली आहे. चिपळूण मध्ये अक्षरशः रस्त्याची चाळण झाल्याचे या व्हिडिओमधून दिसत आहे. चिपळूण येथील दिव्य रत्नागिरी या स्थानिक वृत्तवाहिनीवर निहार कोवळे या युवासेना अध्यक्षाने संताप व्यक्त करत रस्त्यांची झालेली दुरावस्था मांडली तसेच तालुक्यातील रस्त्यावर आक्रमक भूमिका देखील मांडली आहे. जवळच हॉस्पिटल असून हे खड्डे तीन ते चार फूट लांबीचे असून अनेक अपघात घडल्याचे देखील त्यांनी सांगितले.
माझ्या नावे खंडणी मागणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – चंद्रकांत पाटील
हि व्हिडिओ शेअर करत ठाकरे सरकारवर निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. ‘ एकही क्षेत्र असं नाही जिथे ठाकरे सरकारने समाधानी काम केले. सगळ्या बाजूंनी लोकांची तक्रार, असंतोष व दुःख दिसतय. नियोजन शून्य काम करण्यामध्ये ठाकरे सरकारचं देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर नाव असेल. ह्या व्हिडिओ मध्ये ह्यांचाच युवा सैनिक मुंबई गोवा महामार्गाबद्दल तक्रार करतोय,’ अशा शब्दांत परत एकदा त्यांनी यावर भाष्य केलं आहे.
देशात कोरोना पसरवणाऱ्या तबलिकींना भारतात ‘इतके’ वर्ष नो एन्ट्री…
एकही क्षेत्र असं नाही जिथे ठाकरे सरकारने समाधानी काम केले. सगळ्या बाजूंनी लोकांची तक्रार, असंतोष व दुःख दिसतय. नियोजन शून्य काम करण्यामध्ये ठाकरे सरकारचं देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर नाव असेल. ह्या व्हिडिओ मध्ये ह्यांचाच युवा सैनिक मुंबई गोवा महामार्गाबद्दल तक्रार करतोय. pic.twitter.com/D2EXtxYUPE
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 21, 2020
काल निलेश राणे यांनी, ‘ राज्यातील १३०० डॉक्टर आंदोलन करणार आहेत. नोकरीत कायम न केल्यामुळे डॉक्टरांची नाराजी आहे. राम मंदिरचा विषय काढून हिंदूंना डिवचण्यापेक्षा पवार साहेबांनी राज्य सरकारवर लक्ष द्यावे. राज्य सरकारने अगोदरपासून गंभीरतेने घेतलं असतं तर महाराष्ट्र ह्या संकटात देशामध्ये १ नंबर नसता.’, असे ट्विट केले होते. त्यामुळे निलेश राणे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे सद्या दिसून येत आहे.
शेतकरी हेच महाविकासआघाडीचे केंद्रबिंदू, दूध उत्पादकांना मदत करणार: पशु व दुग्धविकास मंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

