Share

शेतकरी हेच महाविकासआघाडीचे केंद्रबिंदू, दूध उत्पादकांना मदत करणार: पशु व दुग्धविकास मंत्री

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारविरोधात काल पासून जोरदार आंदोलन चालू केले आहेत. भाजपाने काल, तर अनेक शेतकरी संघटनांनी काल व आज आक्रमक आंदोलन केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, छावा संघटना यासह विविध शेतकरी संघटनांनी आज आक्रमक पवित्रा घेतल्याचे राज्यभर दिसून आले.

या पार्श्वभूमीवर मंत्रालयात राज्याचे पशु आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह इतर काही संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. दूध उत्पादकांना मदत करण्याची आमची भूमिका आहे, असे मत पशु-दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं.

मी मुंडे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता, पंकजाताईशी वाद असण्याचं कारणच नाही ; खासदाराचा खुलासा

“मात्र कोरोना संकटामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. दूध उत्पादकाना मदत करण्याची आमची भूमिका आहे. गेल्या सरकारने 5 रुपये अनुदानाचा निर्णय घेतला. मात्र अनेकांना लाभच मिळाला नाही. हे टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू हा शेतकरीच आहे,” असेही सुनील केदार यांनी सांगितले. यासंदर्भात टीव्ही ९ ने वृत्त दिले आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे सामूहिक संक्रमण नाही: मंत्री शंभूराज देसाई

तर, यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, राजू शेट्टी यांच्याबाबत मी काहीही बोलणार नसून राज्य धोरणांचा निर्णय हा मंत्रिमंडळ स्तरावर केला जातो मंत्री स्तरावर नाही. दरम्यान, दूध भुकटीबाबत मी केंद्राशी संपर्क केला असून गडकरी, फडणवीस यांनाही पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले.

#होस्टेल_डेज : वसतिगृहाच्या जीवनात आपण हक्काची माणसं कमावतो

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!