🕒 1 min read
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये काल (सोमवार दि. २० जुलै) रोजी धक्कादायक प्रकार समोर आला असून माझ्या नावाचा वापर करुन खंडणी मागितल्याची घटना समोर आली. त्यासंदर्भात सर्व कायदेशीर कारवाई केली असून, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची गंभीर दखल घेऊन तात्काळ संबंधितांस अटक करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘कोरोना महामारीचा सामना करताना, काहीजण याचा गैरफायदा घेत आहेत. काल सोमवार दि. २० जुलै रोजी पिंपरी-चिंचवड आणि कोथरुड मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. माझ्या नावाचा गैरवापर करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. याविरोधात आमदार महेश लांडगे आणि आ. लक्ष्मण जगताप यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे’. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
देशात कोरोना पसरवणाऱ्या तबलिकींना भारतात ‘इतके’ वर्ष नो एन्ट्री…
तर कोथरुड स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी स्वत: पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. तसेच, असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करावी, अशी सूचना ही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे..
शेतकरी हेच महाविकासआघाडीचे केंद्रबिंदू, दूध उत्पादकांना मदत करणार: पशु व दुग्धविकास मंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

