मुंबई : मंगळवारी राज्यात करोनाच्या १५० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्येने एक हजारचा टप्पा पार केला असून, संख्या १०१८ वर पोहोचली. एका दिवसात १२ जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील करोनाबळींचा आकडा ६४ झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थेट धारवीला भेट दिली आहे. झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाचे 7 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या या ठिकाणी कोरोना संसर्गाचा धोका प्रचंड वाढला आहे.
तसेच यावेळी टोपे यांनी धारावीमध्ये विलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा असलेल्या राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्सलाही भेट दिली. संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक कडक अमंलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी या विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांना दिले.
टोपे यांनी धारावी पोलिस ठाण्यातच आपली बैठक घेतली. संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी त्यांनी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतानाच नियमांच्या कडक अमंलबजावणीचे निर्देश दिले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
