Share

महाशिवआघाडीची पहिली परीक्षा होणार ‘महापौर’ निवडीत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मराष्ट्रात अभूतपूर्व गोंधळ निराम झाल्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी आता शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे राज्यात आता महाशिवआघाडीचे सरकार येऊ घातले आहे. मात्र या महाशिवआघाडीची खरी परीक्षा काही दिवसांत होणाऱ्या महापौर नियुक्तीवेळेस होणार आहे.

पुण्याच्या नव्या महापौरांची निवड २६ नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठी बुधवारी (ता. २०) अर्ज भरण्याची मुदत आहे. या पदाच्या निवडणुकीत महापालिकेत भाजपविरोधात सर्वपक्षीय उमेदवार असण्याची चिन्हे आहेत.

विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांची मुदत येत्या २१ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार असून, त्यानुसार २६ नोव्हेंबरला सकाळी अकराला निवडणूक होईल. त्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

राज्यात भाजप-शिवसेना युतीचे बिनसले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना भाजपपासून लांब राहण्याच्या तयारीत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला साथ देणार नाही. तत्पूर्वी पक्ष श्रेष्ठींना कळविले असून, नेतृत्वाचा आदेश आल्यानंतरच भूमिका जाहीर केली जाईल, असे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले; तर शिवसेनेकडून कोणताही निरोप नाही, असे भाजप नेत्यांनी सांगितले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौरपदासाठी दोन्ही काँग्रेसकडून एकत्रित उमेदवार दिला जाईल आणि त्यासाठी शिवसेनेची मदत असेल, असे दोन्ही काँग्रेसकडून सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195204164105588736?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195197897152663552?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!