🕒 1 min read
मुंबई : भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिले आहे असे आम्हाला अभिमास्पद वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत केले आहे. भगवान बुद्धांचा अहिंसा आणि शांततेचा विचार विश्वव्यापी आहे. बुध्दांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे सारख्या छोट्या लोकांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. संभाजी भिडेंच्या बेताल वक्तव्याचा रिपाइं तर्फे तीव्र निषेध रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
सांगली येथे संभाजी भिडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत बुद्धांचा जगाला उपयोग नसल्याचे निषेधार्ह विधान केले होते. संभाजी भिडेंना छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराने काम करायचे असेल त्यांनी जरूर करावे. आम्हाला छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी आदर्श आहेत. मात्र संपूर्ण जगाने बुद्ध स्वीकारला आहे. संभाजी भिडे च्या वक्तव्याने बौद्ध विचारांच्या महतीला फरक पडणार नाही.संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा रिपाइं तर्फे निषेध करीत असून या पूढे त्यांनी असे वक्तव्य करु नये असा ईशारा रामदास आठवले यांनी आज दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे नेते आहेत. त्यांनी कधीकाळी संभाजी भिडेंला गुरू मानले होते की नव्हते मला माहीत नाही मात्र अशी बेताल विधाने करणाऱ्या संभाजी भिडेला पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरू मानणार नाहीत असे रामदास आठवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178605787062493184?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178605416730595329?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178605143652065281?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
