🕒 1 min read
Aditya Thackeray | मुंबई : कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघात केला आहे.
एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण, घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का?, असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दमदाटीला घाबरून महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारचे मंत्री तंतरले आणि दौरा स्थगित करून बसले. ही अखंड महाराष्ट्रासाठी शरमेची, दुःखाची गोष्ट आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रधर्माशी केलेली गद्दारी आहे! स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत? राग ह्या गोष्टीचा येतो की, खरंतर जो विषय चर्चेचा नाही त्यावर चर्चा करायला निघाले होते, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री घाबरून तिथे गेलेच नाहीत. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Dhananjay Munde | “मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आम्हाला…”, धनंजय मुंडेंचं विधान
- Sambhajiraje Bhosale | “… नाहीतर मला कर्नाटकात यावे लागेल”, संभाजीराजे भोसले यांचा इशारा
- Shambhuraj Desai | “उद्धव ठाकरे अडीच वर्ष कुणापुढे झुकले…”; शंभूराज देसाईंची बोचरी टीका
- Sharad Pawar | शंभूराज देसाईंविषयी प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “मी अशा लहान लोकांबाबत…”
- Jitendra Awhad | मराठी माणूस षंढ आहे, असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी समजू नये – जितेंद्र आव्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
