Share

IND vs BAN | शानदार खेळीनंतर मेहिदी हसन मिराजने केला ‘हा’ मोठा खुलासा, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

रविवारी भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामधील तीन एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना पार पडला. सामन्यांमध्ये बांगलादेशने भारताचा 1 गडी राखून पराभव केला. या सामन्यादरम्यान बांगलादेशच्या मेहिदी हसन मिराज आणि मुस्तफिजूर रहमान यांनी दहाव्या विकेटसाठी 51 धावांची नाबाद खेळी खेळली. या भागीदारीच्या जोरावर बांगलादेश भारतावर विजय मिळवून शकला. बांगलादेशने या सामन्यानंतर तीन एकदिवसीय मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. सामन्यानंतर बोलताना मेहिदी हसन मिराजने मुस्तफिझुर रहमान आणि त्याच्या खेळीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

काल झालेल्या भारत आणि बांगलादेश या सामन्यामध्ये 40 व्या षटकात बांगलादेशाची धावसंख्या 128/4 वरून थेट 136/9 झाली होती. यानंतर भारत हा सामना सहज जिंकणार असे चित्र दिसत होते. मात्र, शेवटच्या विकेटसाठी मेहिदी हसन मिराज आणि मुस्तफिझुर रहमान यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये रहमानने दहा नाबाद धावा केल्या. यामध्ये त्यांनी 2 चौकार मारले. तर दुसरीकडे मेहिदीने 38 धावांची नाबाद खेळी खेळली. यामध्ये त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले.

हा सामना जिंकल्यानंतर मेहिदी हसन मिराज बोलताना म्हणाला की,”आम्ही अल्लाहचे आभार मानतो. मी खरच खूप उत्साही आणि आनंदी आहे. सामान्यादरम्यान मला आणि मुस्तफाजूरला वाटले की आम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे. मी फक्त मुस्तफिझुर शांत राहून 20 चेंडू खेळ असे सांगितले होते. मला आमच्या रणनीतीवर आणि आमच्या खेळीवर लक्ष केंद्रित करायचे होते. आणि त्यामध्ये आम्हाला यश मिळाले आहे. पुढे बोलताना तो म्हणाला की,”मी विकेट घेण्याचा खूप प्रयत्न केला. मला गोलंदाजी आवडते. त्यामुळे ही खेळी माझ्यासाठी खरोखरच स्मरणीय आहे.”

काल झालेल्या या सामन्यांमध्ये भारतीय संघाने सहाव्या षटकामध्ये अनेक झेल सोडले. त्याचबरोबर काल भारतीय संघ खराब क्षेत्ररक्षण, खराब गोलंदाजीमुळे भारतीय संघ दडपणाखाली आला होता. अशा परिस्थितीत बांगलादेशी खेळाडू मेहीदी आणि मुस्तफाझुर यांचा आत्मविश्वास वाढला होता. आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी कालचा सामना आपल्या नावावर केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!