🕒 1 min read
Chitra Wagh | मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या महिला मुख्यमंत्री बाबतच्या वक्तव्यावर भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्री बसवायचे आहे असं विधान केले होते. तसेच, विद्यमान सरकारच्या काळात मुंबईत झालेल्या एका अत्याचाराच्या घटनेत तात्काळ कारवाई केल्याने मुंबई पोलिसांचे आभार मानत ठाकरे सरकार आणि शिंदे सरकारची तुलना देखील वाघ यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची हौस फिटली असल्याचं विधान चित्रा वाघ यांनी केलं आहे. त्यांना जर महिला मुख्यमंत्री बसवायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. उध्दव ठाकरे सद्गृहस्थ आहे. मुख्यमंत्री पदावर कुणीही बसलं तरी सद्सदविवेक बुद्धीने काम करावं, असं देखील त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या काळात महिलांवर किती अत्याचार झाले ? असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे. संजय राठोड यांना त्यांच्याच सरकारने क्लीन चिट दिली होती, पण माझी लढाई सुरूच राहील, अशी टीका देखील वाघ यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत?”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सवाल
- Uddhav Thackeray | मिंधे सरकार दिल्लीश्वरांचे पाय चाटण्यातच धन्य ; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
- Uddhav Thackeray | बिनडोक माणसं राज्यपाल पदावर नको, उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्र बंदचे संकेत
- Eknath Shinde | “…म्हणून मला मोदी-शहांनी मुख्यमंत्रिपदाची संधी दिली”, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
- Ashish Shelar | संजय राऊत फक्त तोंडाच्या गरम वाफा बाहेर काढतात – आशिष शेलार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
