Share

Sanjay Raut | “कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्र्यांनी…”; संजय राऊतांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | नाशिक : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकने महाराष्ट्राला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

कर्नाटक सरकारने (Karnataka Govt) जतच्या 40 गावांवर दावा केला होता. अशातच त्यांनी आता जतच्या दुष्काळी भागात पाणी सोडलंय. कर्नाटक सरकारने जतच्या तिकोंडी भागात पाणी सोडलंय. जतच्या नागरिकांनी पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतर कर्नाटक सरकारने थेट जतच्या दुष्काळी भागात पाणी सोडल्याने आता नवीन वाद निर्माण झालाय.

यावर ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले, ” कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसमाधी घेतली पाहिजे.” संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना एकनाथ शिंदेंवर जोरदार घणाघात केला आहे.

चूल्लुभर पाणीमध्ये डूबायला हवे. तुम्ही तुमचा स्वाभिमान गहान आहे. कर्नाटक मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतो आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना सुनावलं आहे. त्याचबरोबर “कॉंग्रेसचे अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केलेला अपमान भाजपला दिसतो, पण शिंदे-फडणवीस यांनी शिवरायांचा झालेला अपमान दिसत नाही. शिवरायांचा अपमान होतो, ही कसली क्रांती,” असा रोखठोक सवाल राऊतानी राज्य सरकारला केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!