🕒 1 min read
Sushma Andhare | मुंबई : नरेंद्र भोंडेकर (Narendra Bondekar) यांनी सुषमा अंधारे यांना भंडाऱ्यातून निवडणूक लढण्याचे आवाहन केले होते. तसेच, सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना फुटणार असल्याचा दावा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला होता. या सर्वांवर सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभे बद्दल सुद्धा विचारण्यात आलं होतं.
मी माझा भाऊ नरेंद्र भोंडेकर यांच्या भेटीला आली, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी भोंडेकरांवर पलटवार करताना दिली आहे. आम्ही सुद्धा आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी आलेलो आहोत. शिवसेना थकलेली नाही. नव्या उमेदीने लढणार हे दाखविण्यासाठी मी आलेली आहे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. चार-दोन आमदार हलले म्हणजे शिवसेना संपली असे होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
यादरम्यान, शिवसेनेचे मुख्य बेस हे त्यांचे वोटर आहेत. ते अजूनही शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले आहे. त्यांना नवीन ताकद आणि उमेद देण्याकरिता आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.
प्रकाश महाजनांनी पेढे वाटावे असा सल्ला त्यांनी महाजन यांना दिला आहे. महाजन कुटुंब पर्यायाने भाजप शिवसेना संपविण्यासाठी करत असलेले प्रयत्न त्यातून हे वाक्य आहे, असं सुषमा अंधारे यांनी प्रकाश महाजन यांच्यावर पलटवार केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा चावलाय”; शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची सडकून टीका
- Sanjay Raut | “जे सोडून गेले आहे त्यांनी त्यांची राजकीय कबर खोदली आहे”, संजय राऊतांचा टोला
- Sushma Andhare | “अंधारे बाई तर कहरच करतात, निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या…”; शिंदे गटाचा जोरदार हल्लाबोल
- NCP on Tanaji Sawant | आरोग्य मंत्र्यांना त्यांचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसे सांभाळणार ; राष्ट्रवादीचा सवाल
- Sambhajiraje Bhosale | उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता संभाजीराजे भोसले राज्यपालांवर संतापले, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
