🕒 1 min read
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीन एकदिवसीय मालिकेमध्ये दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. या मालिकेमध्ये न्युझीलँड संघ 1-0 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत हा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा होता. पण हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने टीम इंडिया आता संकटात सापडली आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघामध्ये अनेक बदल बघायला मिळाले. यामध्ये संघाने सामन्यामध्ये संजू सॅमसंग (Sanju Samsung) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) च्या जागी दीपक हुड्डा (Dipak Hooda) आणि दीपक चहर (Dipak Chahar) यांचा संघामध्ये समावेश केला होता. तर या बदलामुळे संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. हा सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) ने संजू सॅमसंगला संघामध्ये स्थान का नाही मिळाले, याचे उत्तर दिले.
भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन म्हणाला की,”आम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहाव्या गोलंदाजाचा समावेश करायचा होता. त्यामुळे आम्ही संजू सॅमसंगच्या जागी दीपक हुड्डाचा संघामध्ये समावेश केला आहे. त्याचबरोबर आम्हाला या सामन्यांमध्ये दीपक चहरला देखील संधी द्यायची होती. दरम्यान, आम्ही अशा गोलंदाजाच्या शोधात होतो जो चेंडू स्विंग करू शकेल. परिणामी न्यूझीलंडच्या फलंदाजाला खेळणे सोपे जाणार नाही. त्यामुळे आम्ही संघामध्ये दीपक चहर आणि दीपक हुड्डा यांचा समावेश केला आहे.” त्याचबरोबर भारतीय संघामध्ये अर्षदीप सिंग आणि उमरान मलिक हे दोन युवा वेगवान गोलंदाज देखील सामील आहेत.
न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने पहिल्या स्पेलमध्ये चांगलीच धुमाकूळ घातली होती. तर दुसऱ्या स्पेलमध्ये शार्दुल थोडा महागडा ठरला. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने दुसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये शार्दुलच्या ऐवजी दीपक चहरला संघात सामील केले. दीपक चहर नुकताच दुखापतीनंतर परतला आहे. मात्र, पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे दीपक चहर आणि दीपक हुड्डा यांना आपली कामगिरी सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही.
महत्वाच्या बातम्या
- Job Alert | अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौदलात ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- BJP | “उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे”, या भाजप खासदाराचा टोला
- Sachin Ahir | “कोणाचं मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडलं…”, सचिन अहिर यांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
- Sushma Andhare | सुषमा अंधारेंनी शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या…
- Uday Samant | “मी कुठंतरी वाचलंय रेडा हे…”, उदय सामंत संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
