Share

Chandrakant Khaire | “एकदा मी अब्दुल सत्तारांना माईकने मारणार होतो, पण…”; चंद्रकांत खैरेंचा जोरदार हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

Chandrakant Khaire | औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. याच पार्वश्वभूमीवर माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर सडकून टीका केलीय.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “सत्तार नावाचा हा हिरवा साप संभाजीनगर कधीच म्हणत नाही, ते औरंगाबाद म्हणतात. एकदा डीपीडीसीमध्ये मी सत्तारांना माईकने मारणार होतो. तेव्हा पतंगराव कदम माझ्या बाजूला होते. ते म्हणाले खैरे तुम्ही पालकमंत्री होता, असं मारामाऱ्या करू नका.”

दरम्यान, अब्दुल सत्तारांनी खैरेंच्या डोक्यावर गोमुत्र टाकण्याचं विधान केलं होत. त्यांच्या या वक्तव्याला चंद्रकांत खैरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, “अब्दुल सत्तार म्हणाले की, खैरेंचं काय राहिलं, खैरेंच्या डोक्यावर गोमुत्र टाका. सत्तारांना हे कळत नाही की गोमुत्र किती पवित्र असतं. आम्ही रोज घरात हिंदुत्वाप्रमाणे गोमुत्र शिंपडतो, आम्ही हिंदुत्व जाणतो. मात्र, हे वाटेल तसं बोलतात.”

“सत्तार म्हणाले की, मी आता पालकमंत्री म्हणून किती चांगलं काम करत आहे. याआधी कोणीच काम केलं नाही. मात्र, सत्तारांनी काम करून दाखवावं. त्यांना या कामातलं काय समजतं. डीपीडीसीमध्ये काय चाललं आहे हे काही समजतं का?”, असा सवाल खैरेंनी यावेळी बोलताना केलाय. तसेच अब्दुल सत्तार फक्त पैसे कसे मिळतील हे पाहतात, अशी टीकाही त्यांनी केलीय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!