🕒 1 min read
Ambadas Danve | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासोबत केली. यानंतर राज्यात वातावरण तापलेलं दिसत आहे. अनेक नेके कोश्यारींवर टीका करत असून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीका केली आहे. यावेळी मात्र, दानवेंची जीभ घसरल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
अरे हरा***, मी बोलणाराच, काय गुन्हा दाखल करायचा माझ्यावर तो करा. छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळाचे देखील आदर्श आहेत लक्षात ठेवा, मी जबाबदारीने बोलतो. गुन्हा दाखल झाला आणि अटक झाली तरीही चालेल, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
अरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे भवानी तलवार होती. आज जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी तुझी जीभ एका मिनटात कापली असती, असा घणाघात देखील दानवेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Winter Update | राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी, तर नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद
- Amol Mitkari | भगतसिंग कोश्यारींवर अमोल मिटकरींचा घणाघात, म्हणाले…
- Sanjay Raut | “भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी…”, संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
- Jitendra Awhad | “यांच्या बापाने यांना…”, राज्यपालांवर जितेंद्र आव्हाड कडाडले
- Uddhav Thackeray | “राज्यपालांनी पुन्हा एकदा माती खाल्ली अन्…”, उद्धव ठाकरेंचा घणाघात


