Share

T20 World Cup | टीम इंडियाच्या पराभवानंतर अजय देवगनने केली भावूक पोस्ट, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: टी 20 विश्वचषक (T20 World Cup) च्या दुसऱ्या उपांत्य फेरी (Semi final) मध्ये इंग्लंड (England) संघाने भारतीय (India) संघाला 10 विकेट्स पराभूत केले. या पराजयामुळे प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहता नाराज झाला असून टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे सगळेजण नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाच्या या पराभवानंतर बॉलीवूड सेलिब्रिटींकडून देखील संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. कारण अंतिम सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि भारत यांचा सामना बघायची चाहत्यांना आतुरता लागली होती. पण उपांत्य फेरीमध्ये भारताच्या पराभवामुळे चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

दरम्यान, बॉलीवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) याने उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलरवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ” संपूर्ण राष्ट्राच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही मनापासून तयारी केली होती. तरीही तुम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नसला, तरी आम्ही तुमच्या उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवासाचा आनंद लुटला आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देशाचं ओझं बाळगून इतक्या मोठ्या स्तरावर खेळताना तुमच्यावर किती दबाव पडत असेल याचा आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही.”

या पोस्टमध्ये पुढे अजय देवगन म्हणाला की, ” जिंकणे किंवा हरणे हा खेळाचा एक भाग आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. चांगल्या परिस्थितीबरोबरच वाईट परिस्थितीमध्ये आम्ही जगातल्या सर्वोत्तम संघाच्या पाठीशी उभे आहोत. त्यामुळे नाराज न होऊन जाता पूर्वीपेक्षा अधिक मजबूतपणे आणि चांगल्या पद्धतीने आपण पुनरागमन करू.”

तर दुसरीकडे, अभिनेता फरहान अख्तर याने देखील भारतीय क्रिकेट संघाला संबोधून एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “इंग्लंडने भारतीय संघाला मागे टाकले असेल तरी, भारतीय संघाच्या दमदार कामगिरीसाठी आम्ही तुमचे अभिनंदन करत आहोत. इंडियासाठी तो एक निराशाजनक दिवस होता पण हा प्रवास इथेच संपत नाही.”

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!