Share

Sunil Raut On Sanjay Raut : संजय राऊतांना जामीन मिळणार? सुनिल राऊत म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Sunil Raut | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मागील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. यावेळी राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने लेखी उत्तर सादर केलं होतं. जामिनावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत (Pravin Raut) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीनावर आज कोर्ट निर्णय देणार आहे. यावर संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनिल राऊत म्हणाले, “न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आज जामीन अर्जावर सुनावणी आहे.  महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेचे आशीर्वाद संजय राऊत यांच्यावर आहेत. संजय राऊत यांच्या जामीनाबाबत आम्ही आशादायी आहोत. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले. संजय राऊत यांनी शिवसेनेसाठी जेलमध्ये जाणे पत्करलं, ते कोणासमोर झुकले नाहीत,”

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला.

राऊत  यांचे भाऊ प्रवीण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करुन सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे. या संदर्भात कोर्ट आज काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!