Share

Sushma Andhare | “…त्यामुळे शिरसाट हे ठाकरे गटात परतणार”, सुषमा अंधारेंचा दावा

Published On: 

Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे अलिकडे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अशातच त्यांनी केलेल्या मोठ्या दावामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे शिंदे गटामध्ये नाराज असल्याचं सांगत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मोठा दावा केला आहे.

संजय शिरसाट हे शिंदे गटामध्ये नाराज आहे. आता एकाच भागात किती लोकांना मंत्रिपद दिले जातील. अतुल सावे, संदीपान भुमरे, सत्तार यांना मंत्रिपद दिलं. आता याच भागात आणखी किती नेत्याला मंत्रिपद दिली जाणार, याची शक्यता आता मावळली आहे, त्यामुळे शिरसाट हे ठाकरे गटात परत येऊ शकता, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

अब्दुल सत्तार यांच्या सभेला जे एकाच भागात येतात. त्या सभेकडे शिरसाट यांनी पाठ फिरवली होती. विशेष म्हणजे, त्यांना निमंत्रण सुद्धा होते. पण तरीही ते आले नाही. आता एकाच भागात किती लोकांना मंत्रिपद दिले जातील. अतुल सावे, संदीपान भुमरे, सत्तार यांना मंत्रिपद दिलं. आता याच भागात आणखी किती नेत्याला मंत्रिपद दिली जाणार, याची शक्यता आता मावळली आहे. एवढंच नाहीतर नेतपदाची यादी जाहीर झाली होती, त्यामध्ये सुद्धा शिरसाट यांच्या तोंडाला पानं पुसली. नेते, उपनेते पद सुद्धा शिंदे गटाने दिलं नाही, असं म्हणत संजय शिरसाट शिवसेनेत परत येतील, असं देखील अंधारेंनी म्हणाल्या.

बीकेसी मैदानावर मेळावा घेतला तेव्हा शिंदे गटाची किती ताकद आहे, यात शिंदे गट उघडला पडला आहे. त्यामुळे भाजप आता शिंदे गटाला गृहीत धरत नाही, त्यांच्या मुळावर उठला आहे. भाजपने आता श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. प्रताप सरनाईक यांना मधल्या काळात थोडी सवलत मिळाली होती. जर सरनाईक यांनी आपला मतदारसंघ सोडला नाहीतर ईडीकडून संपत्तीवर टाच आणली जाईल, असा दावा देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!