Share

T20 World Cup | उपांत्य फेरीच्या आधी सरावादरम्यान रोहित शर्मा जखमी, संघाबरोबर चाहतेही काळजीत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) टी 20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup) आता शेवटचे टप्प्याकडे वळली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरी (Semi final) मध्ये खेळणाऱ्या चार संघांची नावे देखील निश्चित झाली आहे. भारत (India), पाकिस्तान (Pakisthan), इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (Newzealand) या संघांनी अंतिम चार मध्ये स्नान मिळवले असून यांच्यामध्ये उपांत्य स्पर्धा पार पडणार आहे. तर, टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामान्यआधीच भारतीय संघाला आणि क्रिकेटच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाल्याची बातमी मिळाली आहे. उपांत्य फेरीच्या सरावादरम्यान, रोहित शर्मा हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.

10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला आहे. सरावादरम्यान उसळी घेणारा एक चेंडू रोहितला लागल्याने तो जखमी झाला आहे. रोहितला उजव्या हाताला दुखापत झालेली असूनही जखम किती गंभीर आहे याबद्दल कुठलीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, रोहित उपांत्य फेरीमध्ये खेळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण हा निर्णय त्याची दुखापत किती गंभीर आहे यावर घेतला जाईल अशी देखील चर्चा सुरू आहे.

उपांत्य फेरीसाठी पात्र सर्व संघ सध्या सामन्यासाठी सराव करत आहे. भारतीय संघ देखील जोरात उपांत्य फेरीसाठी सराव करत आहे. सरावादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला उजव्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर रोहितने लगेचचं सराव थांबवला. भारतीय संघ नेटमध्ये सराव करत असताना हा सर्व प्रकार घडला. यानंतर रोहितने सराव थांबून ब्रेक घेतल्याचे सराव सत्राच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर भारतीय क्रिकेट संघासोबत भारतीय क्रिकेट संघाचे चाहते देखील टेन्शनमध्ये आहे. रोहितला नेमकी काय आणि किती दुखापत झाली आहे या संदर्भात अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

कर्णधार रोहित शर्माची सराव सत्र दरम्यान झालेली ही दुखापत गंभीर असेल तर दीपक हुडा किंवा दिनेश कार्तिक त्याच्या जागी भारतीय संघामध्ये खेळू शकतात. झिम्बावे विरुद्धच्या सामन्यांमध्ये ऋषभ पण खेळायला होता. तर हुडा आणि पंत या दोघांनी यापूर्वी सलामीला फलंदाजी केली होती. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली या दोघांचाही सलामीवीर म्हणून विचार केला जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!