Share

NCP | देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेला प्रकल्प जुनाच; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

NCP | मुंबई : राज्यातील अनेक प्रकल्प बाहेर जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नवीन प्रकल्प राज्याला मिळाल्याची घोषणा केली होती. रांजणगाव इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रोजेक्ट, असं त्या प्रकल्पाचं नावं आहे. मात्र, हा प्रकल्प जुनाच असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी केला आहे.

एअर इंडियाचं कार्यालय दुसऱ्या राज्यात गेलं आणि आता जर कोणी रांजणगावमध्ये असा प्रकल्प आणल्याच्या घोषणा करत असेल तर रांजणगाव एमआयडीसी सुरू झाल्या पासून हजारो कंपन्या आल्या हजारो कोटींची गुंतवणूक करून मोठा रोजगार आधीच निर्माण झाला आहे, असा घणाघात वळसे पाटलांनी केला आहे.

पाच हजार लोकांना रोजगार मिळेल अशी समजूत काढण्याच काम केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत करत आहे. ही एक प्रोसेस असून हा प्रकल्प नव्याने आलंय असं काही मानायचं कारण नाही, असा टोला देखील पाटलांनी लगावला आहे.

दरम्यान, रांजणगाव येथील IFB चा आलेला प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या सरकार च्या काळात आलेला आहे. या प्रकल्पासाठी जी जागा आरक्षित केली गेली ती महाविकास आघाडीच्या सरकारने केली आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक आमदार अशोक पवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!