🕒 1 min read
Shahajibapu Patil | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. सतत सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये टीका, टिपण्णी सुरू असते. अशातच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते एकनाख खडसे (Eknath Khadse) यांनी “बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला”, अशी टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्यावर केली होती. खडसेंनी केलेल्या टीकेला आता पाटलांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil)
एकनाथ खडसे यांना माझ्या मर्दांनगीचं वेड का लागले आहे, त्यांनी माझी मर्दांनगी तपासू नये. त्यांनी त्यांच बघावं, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ खडसे यांना चांगलंच सुनावलं आहे. प्रसार माध्यमांशी शहाजीबापू पाटलांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
हा माझ्या जीवनात घडलेला एक अपघात आहे.पराभवाच्या काळातील मी माझे दुःख मित्राला सांगत होतो. ते व्हायरलं झालं. गणपतराव देशमुखांसारख्या नेत्याच्या विरोधात मी लढत होतो. त्यामुळे मला संसाराकडे लक्ष देता आलं नाही, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारी संपत्तीवर ढापा मारून मी संसार केला नाही. माझे हात पापाने बरबटलेले नाहीत, असा टोलाही खडसेंना पाटलांनी लगावला आहे.
दरम्यान, शहाजीबापू पाटील एका ठिकाणी भाषण करताना, त्यावेळी त्यांनी ‘बायकोला साडी घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे नव्हते’, असं विधान केलं होतं. या विधानावरून “बायकोलाही साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी शहाजीबापूंवर केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Gujrat | धक्कादायक! गुजरातमध्ये पूल कोसळला, १२० जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता
- IND vs SA । केएल राहुल पुन्हा एकदा ठरला फ्लॉप, फॅन्सने सोशल मीडियावर केलं ट्रोल
- IND vs SA । दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 5 गडी राखून विजय
- Bachhu Kadu । नाव बच्चू असंल तरी आडनाव कडू आहे हे लक्षात घ्या; बच्चू कडूंचा इशारा
- T-20 World Cup । टी 20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नावावर आणखीन एक मोठं रेकॉर्ड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
