🕒 1 min read
Eknath Khadse | अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे सधया अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमधील एका सभेला संबोधित करताना त्यांनी केंद्रसरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलाच निशाणा साधलेला पाहायला मिळाला. दिवाळीच्या एका रात्रीत 18 टक्क्यांनी महागाई वाढवण्यात आली. जीएसटी लावण्यात आला. त्यामुळे लोकांमध्ये जीएसटीची भीती आहे. जीएसटी लावतील या भीतीने लोक टाळ्या वाजवत नाहीत, असा टोला एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी लगावला आहे.
नाथाभाऊ बोलतो म्हणून याचा आवाज बंद करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं सांगत त्यांनी सत्ताधारी पक्षाला चिमटा काढलाय. आवाज उठवला की तुमच्यामागे ईडी, (ED) सीबीआय (CBI) लागते. आता तर अशी कोणतीच यंत्रणा नाही की माझी चौकशी करत नाही. पण मी तुमच्या आशीर्वादाने मजबूत आहे, असं सांगतानाच ईडी चौकशी करत असताना एसीबीच्या चौकशीची गरज काय? असा सवाल त्यांनी केला. भोसरीच्या प्रकरणात अडकवून विनाकारण मानसिक त्रास देत असल्याचं खडसे म्हणाले.
ते म्हणाले, भोसरीच्या प्रकरणात अनेकदा मी स्पष्टीकरण दिलंय. त्या व्यवहाराशी माझा कुठलाही संबंध नाही. जाणीवपूर्वक माझा छळ करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीच्या चौकशी करत आहे. एसीबीच्या माध्यमातून या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी झाली. चौकशीमध्ये काहीच आढळले नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मागे पुण्याच्या न्यायालयामध्ये सरकारच्या माध्यमातून क्लोजर रिपोर्ट सादर केला त्याला दोन वर्षे झाली. दोन वर्षे झाल्यानंतर आता सरकारला का जाग आली? असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्रामध्ये 70 वर्षात कधी झालं नाही, एवढ्या खालच्या पद्धतीने राजकारण सुरू असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. 50 खोके सबकुछ ओके झालं आहे. मला मतदान करू नये म्हणून गिरीश महाजन देवेंद्र भुयार यांना फोन करत होते असा गौप्यस्फोट खडसेंनी केलाय. काही आमदारांनी 50 खोके घेऊन मतदारसंघ विकून टाकला. ज्यांना आम्ही घडवतो, तेच आमच्या अंगावर बसतात, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray । “एकनाथ शिंदेंच्या बाबतीत ‘ती’ एक चूक आम्हाला महागात पडली”; आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
- Diwali 2022 | दिवाळी लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त कधी आहे त्याचबरोबर घरी आणि ऑफिसमध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे? जाणून घ्या
- Anil Deshmukh । अनिल देशमुखांना मोठा झटका; सीबीआय प्रकरणातील जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
- Diwali 2022 | ‘या’ पद्धती वापरून दिवाळी पूजेचे ताट सजवा
- Rohit Pawar | “लहान मुले चॉकलेटसाठी रडतात, तसे…”, रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

