🕒 1 min read
Aditya Thackeray | मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेतच दोन गट निर्माण झाल्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झालेली पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांनी याआधी देखील बंड करण्याचा इशारा दिला होता अशी चर्चा ऐकायला मिळत होती. यावर आता आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. एक दिड वर्षांपूर्वीच एकनाथ शिंदेच्या या सगळ्या प्रकाराची कुजबूज आमच्यापर्यंतही पोहोचली होती. पण लोकांमध्ये सुरु असलेल्या चर्चांमुळे आमच्यात दरी निर्माण होऊ नये म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं.” असा गौप्यस्फोट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आमच्या घरात साधारण एक ते दीड वर्षांपूर्वीच चर्चा झाली होती. त्यांच्या या सगळ्या प्रकाराची कुजबूज आम्हाला तेव्हाच मिळाली होती. गेल्या वर्षी आम्ही दावोस दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा २० मे रोजी उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांना मातोश्रीवर बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का, असं थेट विचारलं होतं. इतकचं नाही तर, नक्की काय गडबड सुरू आहे, असंही त्यांनी शिंदेंना विचारलं होतं,’ असा खुलासा आदित्य ठाकरेंनी यावेळी बोलताना केला.
एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी त्यांच्या कामात ठाकरेंनी अडथळा आणल्याचा दावा केला होता. यावर देखील आदित्य ठाकरे म्हणाले, असा एक तरी विरोधी पक्षातला किंवा भाजपाचा आमदार, खासदार सांगा ज्याला शिवसेना म्हणून किंवा सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार म्हणून अडीच वर्षात आम्ही सतावलेलं आहे. कोणाची तडीपारी काढलीय? कोणाच्या मागे यंत्रणाला लवलीय? कोणी असंही सांगू शकणार नाही की तुम्ही आमच्यावर नजर ठेवली. लोकशाही आहे. सगळ्यांनी सगळ्यांची कामं करावीत. कोणाची कामं अडवलेली नव्हती सगळ्यांची काम नीट सुरु होती,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही एकनाथ शिंदेंवर डोळे बंद करुन विश्वास ठेवला हीच आमची चूक झाली अशी खंत आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवली. “त्यांच्या काही जवळचे लोक, पीए वगैरे जेलमध्ये होते की काय हे जगजाहीर आहे. पण विश्वास आपल्या माणसांवर ठेवायचा की जे येऊन सांगतात त्यांच्यावर? हा माणूस फूटू शकतो, आमच्याबरोबर येऊ शकतो असं सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? कदाचित यात आमची चूक झाली,” असं आदित्य यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाकडून शिंदे गटावर गद्दार असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. यासंदर्भात बोलताना आदित्य यांनी युनायटेड किंग्डममधील उदाहरण दिलं. “या राजकारणात टीकायला घाणेरडं राजकारणच तुमच्या रक्तात लागतं का? की आपण हे स्वच्छ करणार आहोत राजकारण याचा विचार केला पाहिजे. जगात आपण पॅटर्न बघतो जेव्हा लक्षात येतं की युनायटेड किंग्डममध्येही चार वर्षात तीन पंतप्रधान झाले आहेत. पण अशी गद्दारी कुठेच झाली नाही की स्वत:लाच विकून टाकतो,” अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या :
- Anil Deshmukh । अनिल देशमुखांना मोठा झटका; सीबीआय प्रकरणातील जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
- Diwali 2022 | ‘या’ पद्धती वापरून दिवाळी पूजेचे ताट सजवा
- Rohit Pawar | “लहान मुले चॉकलेटसाठी रडतात, तसे…”, रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा
- Viral Video | टीव्ही आणि कम्प्युटर पाण्याने धुणाऱ्या ‘या’ तरुणाचा व्हिडिओ झाला व्हायरल
- Pradeep kanase | सामाजिक गद्दारांना राजकीय गद्दार पाठीशी घालतोय, चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा – प्रदीप कणसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
