🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण देशात दिवाळी Diwali हा सण मोठ्या आनंदात आणि उत्सवात कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. या सणाचा जल्लोष आणि उल्हास देशभर बघायला मिळतो. दिवाळीच्या दिवशी सर्वत्र दिव्यांच्या प्रकाशाने देश उजळून निघतो. सर्व धर्माचे लोक दिवाळी आनंदाने साजरी करतात. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देते, अशी धार्मिक मान्यता आहे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेराची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते.
प्रदोश काळामध्ये आणि मध्यरात्री माता लक्ष्मीची उपासना केलेली सर्वोत्तम उपासना मानली जाते. पण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची योग्य पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लक्ष्मीपूजनाचा विधी सांगणार आहोत.
दिवाळी लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त
या वर्षी 24 आणि 25 रोजी ऑक्टोबर दोन्ही दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्यातल्या अमावस्येलाला दिवाळी साजरी केली जाणार आहे. या वर्षी 25 ऑक्टोबरला प्रदोष काळाच्या आधी अमावस्या तिथी संपत आहे. त्याचबरोबर 24 ऑक्टोबर रोजी प्रदूषकातील अमावस्या तिथी आहे. त्यामुळे यावर्षी 24 ऑक्टोबर रोजी देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे.
लक्ष्मी पूजा विधी
- दिवाळीच्या दिवशी घराची साफसफाई करून माता लक्ष्मीचे पदचिन्हे काढून, दारात रांगोळी काढून, शुभ लाभ लिहून, स्वस्तिक काढून, दारावर तोरण बांधून, आंब्याचे पान लावून घराला पूर्णपणे प्रसन्न करावे.
- त्यानंतर दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या मूर्तीला नव्याने विराजमान करायचे प्रदोषाच्या शुभमुहूर्तावर पूजेच्या जागी गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करून घ्यावी. त्याचबरोबर पूजेच्या पाटावर लाल कपडा घालून श्री लक्ष्मी, श्री गणेश आणि माता सरस्वती यांच्या मूर्ती पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे तोंड करून ठेवाव्या.
- श्री गणेश, श्री लक्ष्मी आणि माता सरस्वती यांच्या मूर्तीची स्थापना करताना, “या सा पद्मासनास्था विपुल-कटि-तटी पद्म-पत्रायताक्षी, गम्भीरार्तव-नाभि: स्तन-भर-नमिता शुभ्र-वस्त्रोत्तरीया, या लक्ष्मीर्दिव्य-रूपैर्मणि-गण-खचितै: स्वापिता हेम-कुम्भै:, सा नित्यं पद्म-हस्ता मम वसतु गृहे सर्व -मांगल्य-युक्ता” हा मंत्रोच्चार करावा.
- त्यानंतर पाटावर मूर्ती जवळ तांदूळ टाकून त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यामध्ये आंब्याची पाने टाकून लाल कपड्यात गुंडाळलेले नारळ त्यावर ठेवा. हे वरुण देवाचे प्रतीक मानले जाते.
- देवी लक्ष्मीच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा तर हाताच्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा. दिव्यांमध्ये मुबलक प्रमाणात तेल आणि तूप घाला म्हणजे पूजा संपेपर्यंत दीप प्रज्वलित राहून रात्रभर अखंड ज्योत तेवत ठेवता येईल.
- भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर चांदीच्या किंवा पितळेच्या ताटात अक्षत ठेवून त्याभोवती स्वस्तिक काढून त्यात चांदीची नाणी, दागिने इत्यादी गोष्टी ठेवून त्याची पूजा करावी. शक्य असल्यास माता लक्ष्मीच्या मूर्तीला सोन्या-चांदीचे दागिने घाला.
- यानंतर मुख्य पूजेला सुरुवात करून गणपतीला चंदनाचा टिळा लावून त्याला जानवे घालून अक्षत, फुले आणि दुर्वा अर्पण करा. त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला पंचामृत आणि अभिषेक करून हळदी कुंकू लावावे.
- त्यानंतर माता लक्ष्मी आणि सरस्वती यांना हळद, कुंकू, अक्षद, पान, सुपारी, फुल, मिठाई इत्यादी गोष्टी अर्पण करून त्यांचे आराधना करावी.
- यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या मंत्राचा जप करून ध्यान करावे. त्यानंतर माता लक्ष्मी आणि गणपतीला नैवेद्य दाखवून त्यांची आरती करून पूजा संपन्न करावी.
टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Anil Deshmukh । अनिल देशमुखांना मोठा झटका; सीबीआय प्रकरणातील जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
- Diwali 2022 | ‘या’ पद्धती वापरून दिवाळी पूजेचे ताट सजवा
- Rohit Pawar | “लहान मुले चॉकलेटसाठी रडतात, तसे…”, रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा
- Viral Video | टीव्ही आणि कम्प्युटर पाण्याने धुणाऱ्या ‘या’ तरुणाचा व्हिडिओ झाला व्हायरल
- Pradeep kanase | सामाजिक गद्दारांना राजकीय गद्दार पाठीशी घालतोय, चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा – प्रदीप कणसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
