🕒 1 min read
Eknath Shinde Group | जळगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) यांनी भाजप (BJP) पक्षासोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. या सरकारला तीन महिने पूर्ण झाले आहेत. विरोधी पक्षनेत्यांकडून असा दावा करण्यात येतं आहे की, शिंदे गटातील नेत्यांना मंत्रीपद दिले नसल्यानं ते नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटातील नेते आणि जळगावचे (Jalgaon) आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी खळबळजनक विधान केलं आहे.
काय म्हणाले किशोर पाटील(Kishor Patil)
मंत्रीपदाचे काय करता? मी स्वत: ला मुख्यमंत्री (Cheif Minister) समजतो, असं विधान किशोर पाटील (Kishor Patil) यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. आमदार नाराज असल्याच्या बातम्या नेमक्या कुठून येतात हे मला माहिती नाही. मात्र, मी कधीही नाराज नव्हतो. या मंत्रीपदाचे काय करता? मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो. मी नक्कीच मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. मात्र मी नाराज नाही. जर मला मंत्रीपदाची संधी मिळाली तर मी निश्चितच या संधीचं सोनं करेन. राज्याच्या हिताचे निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न असेल, असं किशोर पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच, खूप चर्चेत असेलेल्या अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीमध्ये भाजप-शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असं चित्र होतं. परंतू भाजप पक्षाने आपल्या उमेदवाराला माघार घ्यायला लावली. भाजपने घेतलेल्या या माघारीवरूनही किशोर पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भाजपाने माघार घेण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला. एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाले असेल आणि त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य पोटनिवडणुकीला उभं राहत असेल, तर ती निवडणूक बिनविरोध करण्याचा आपला प्रयत्न असतो. ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती टीकवण्याचे काम भाजपाने केलं. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असं किशोर पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची ED-CBI कडून चौकशी करण्याची मागणी; मुंबई हायकोर्टात आज सुनावणी
- Sandipan Bhumare | संदिपान भुमरे यांच्यावर दुःखाचं डोंगर ; जवळच्या व्यक्तीचं निधन
- Bachhu Kadu | “महाठग खिसे कापणारे आणि…”; बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर सडकून टीका
- Uday Samant | “काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो…”, उदय सामंत यांचा सूचक इशारा
- Bhaskar Jadhav | भास्कर जाधव यांच्या घरावर आज्ञात इसमानांनी केली दगडफेक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
