Sandipan Bhumare | औरंगाबाद : रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यासह त्यांच्या परिवारावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या मावस भावाचा भीषण अपघात झाल असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेले चार जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. जखमी असलेल्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
अंबादास हरिश्चंद्र नरवडे (Ambadas Harishchandra Narvade) असं संदीपान भुमरे यांच्या मावस भावाचं नाव आहे. नरवडे हे औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोडचे रहिवाशी आहेत. ते आपल्या काही सहकाऱ्यांसह इनोव्हा गाडीतून मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत होते. पहाटे 4 वाजता कामशेतजवळ इनोव्हा गाडील टेम्पोला मागून येऊन धडकली. त्यामुळे इनोव्हा डिव्हाडरवर आदळली. त्याचवेळी मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने आणि ट्रकने एकामागोमाग धडक दिली. अचानक झालेल्या या विचित्र अपघतामुळे नरवडे यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतं आहे.
अंबादास नरवडे यांच्यासोबत त्यांचे मित्रं आणि गाडी चालक होता. दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तळेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पैठण तालुक्यात खळबळ माजली आहे. जखमी झालेल्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगण्यात येतं आहे.
दरम्यान, मावस भावाच्या निधनाची बातमी समजताच संदिपान भुमरे यांनी नाईट ड्रेसवरच पहाटे घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी आल्यानंतर भुमरे यांनी पोलीस आणि डॉक्टरांकडून घटनेची माहिती घेतली.
महत्वाच्या बातम्या :
- Bachhu Kadu | “महाठग खिसे कापणारे आणि…”; बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर सडकून टीका
- Uday Samant | “काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो…”, उदय सामंत यांचा सूचक इशारा
- Bhaskar Jadhav | भास्कर जाधव यांच्या घरावर आज्ञात इसमानांनी केली दगडफेक
- ST. Employees | एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून ‘इतक्या’ हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर
- Eknath Shinde | दिग्गज नेत्यांचा आदेश धुडकावत शिंदे गटाने भाजपचा महामंत्री फोडला


