Share

Sharad Pawar । अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक ही…; शरद पवारांच्या वक्तव्याने निवडणुकीचा ट्विस्ट आणखी वाढला

Published On: 

🕒 1 min read

Sharad Pawar | मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने फुंकलेलं असताना तसेच प्रचाराला देखील सुरुवात आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे. तसेच हि निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन देखील केलं आहे. राज ठाकरेनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवारांची अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया ( Andheri East Election )

या सर्व घडामोडींवर बोलताना शरद पवार यांनी देखील ही निवडणुक बिनविरोध व्हावी असे अवाहन केले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. ऋतुजा लटके यांच्या विरोधातील अर्ज मागे घ्यावा. अजूनही उमेदवार मागे घेण्यासाठी वेळ असल्याचेही शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे अशी माझी इच्छा आहे. दीड वर्षांच्या कालावधीसाठी राजकारण नको असेही शरद पवार म्हणाले.

राज ठाकरे यांचं फडणवीसांना पत्रातून अवाहन

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून ( Andheri East Election ) आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका असं म्हणत राज ठाकरेंनी ट्वीट केलं आहे. एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्याच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक बिनविरोध होते. हा इतिहास आहे, असंही या पत्रात नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!