🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच अंधेरी (पूर्व) पोट निवडणूक असल्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगलेली पाहायला मिळतं आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी याच पार्श्वभूमीवर शिंदे गटावर हल्ला केला आहे.
काय म्हणाल्या मनिषा कायंदे ?
तुम्ही स्व:तला शिवसैनिक म्हणतात. अजूनही आम्ही शिवसेनेतच आहोत म्हणतात. तर मग तुम्हाला घरातील वाद सोडायला गोवा, सुरत, गुवाहाटीला का जावे लागले? तुम्हाला महाशक्तीची मदत का घ्यावी लागली?, असा खोचक सवाल करत मनिषा कायंदे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना त्या असंही म्हणाल्या की. आमच्यामधून जे सोडून गेले ते सतत दावा करत असतात आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. मग रमेश लटके हे पण शिवसैनिक होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. तुम्ही जर खरच शिवसैनिक आहात तर मग एवढी टोकाची भूमिका का घेत आहात?.
तसेच, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिलेल्या चिन्हावर (मशाल) देखील मनिषा कायंदे यांनी भाष्य केलं आहे. आम्हाला जे चिन्ह मिळालं आहे मशाल हे चिन्ह आम्ही घराघरात पोहोचवू. रमेश लटके यांचं काम आणि शिवसेनेचे विचार यामुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत आमचा विजय निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “… तर तो गुन्हा आम्ही करणारच”, सुषमा अंधारे कडाडल्या
- Nana Patekar | “शिवसेनेत फूट पडली अन् आमच्या घरात…”, नाना पाटेकरांची जाहीर नाराजी
- Shivsena | उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या नावावर ‘या’ ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया! म्हणाले, “नाव जरी…”
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे अडचणीत! धगधगत्या मशालीवर ‘या’ पक्षाचा दावा, निवडणूक आयोगाकडे घेतली धाव
- Ambadas Danve | “गद्दारीची तलवार घेऊन तुम्ही आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केला तरी…”; अंबादास दानवेंचा शिंदे गटावर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
