Share

Chitra Wagh | “शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर…”; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बुधवारी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वेगवगळ्या ठिकाणी दसरा मेळावा पार पडला. शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होता. तर ठाकरे गटाचा शिवाजीपार्कवर होता. त्याचबरोबर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केल्या असल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या मुलावर एक वक्तव्य केलं. बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि आता नातू नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या,असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरूनच अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. अशातच भाजप पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?

पदं वाटताना‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी‘ पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात. महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या स्तरावर कधीचं गेलं नव्हतं. ज्यांनी नेलं त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.   चित्रा वाघ यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ आपल्या ट्विटर आकाऊंटवरून केलं आहे. असं वक्तव्य करताना त्या बाळाच्या आईला काय वाटलं असेल याची जराही कल्पना केली नाही.

त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपद स्विकारण्याची वेळ आली. तेव्हा शिवसैनिक सोडून मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेतलं. मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून पक्षाध्यक्षपदही स्वतःकडेच ठेवलं. शिवसैनिक सोडून आपल्या मुलाकडे मंत्रिपद दिलं. एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच आपल्या पत्नीकडे संपादकपद दिलं. ते एकनाथ शिंदेंच्या नातवावर टीका करत आहेत… अशा राजकारणाचा निषेध करावा तितका कमी आहे. शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात, असं त्यांनी म्हटलं आहे.

नरेश मस्के यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला 

दरम्यान, उद्धव साहेब राजकारण करा, पण निरागस बाळाला यात ओढू नका. लहान मुलांना बोलणे कुठल्या हिंदुत्वात बसते, असा सवाल करत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!