Share

राज्यभरातून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांशी साधला मुख्यमंत्र्यांनी मुक्त संवाद …

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : पावसाळी अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून सुमारे चार हजार 800 पोलीस नागपूर शहरात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलिसांची भेट घेवून त्यांच्यासमवेत मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांसमवेत रांगेत उभे राहून स्वत: जेवण घेतले. तसेच पोलिसांसमवेत पंगतीत बसून मुख्यमंत्र्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांनी पोलिसांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. प्रत्येकाजवळ जावून मुख्यमंत्री त्यांची राहण्याची, जेवण्याची, वैद्यकीय सुविधांची माहिती घेत होते. स्वत: मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या या आस्थेवाईक चौकशीने पोलीसही भारावून गेले.

maharashtra police & camp; devendra fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सायंकाळी या प्रशिक्षण केंद्रातील निवासी पोलिसांची भेट घेतली. राज्याच्या विविध भागातून राज्य पोलीस दल, महामार्ग सुरक्षा पथक, मुंबई रेल्वे या विविध दलाचे सुमारे चार हजार 800 पोलीस सध्या नागपूरात अधिवेशन कर्तव्यावर तैनात आहेत. पोलीस आयुक्तालयामार्फत शहरातील 56 ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी ठिकाणापासून बंदोबस्ताच्या ठिकाणापर्यंत जाण्या-येण्यासाठी वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. तसेच बंदोबस्ताच्या ठिकाणी दुपारी पोलिसांसाठी बफे पध्दतीनुसार जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीसाठी 10 वैद्यकीय पथके तैनात असून पॉलिक्लिनिक मार्फतही पोलिसांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. महिला पोलिसांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी माहिती घेतली.

बंदोबस्तासाठी गावाकडून लांब आलो असलो तरी नागपूर पोलीस आयुक्तालयाने चांगल्या सुविधा दिल्याने येथील कर्तव्य कालावधी आनंददायक आणि समाधानकारक राहिला, अशी प्रतिक्रिया नाशिक येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक वाल्मीक रोकडे यांनी यावेळी दिली.

पोलिसांसमवेत संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, मोठ्या कालावधीनंतर नागपुरात पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनाचे एक वेगळे आव्हान आपल्यासमोर होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला मोठ्या पावसाचा सामना करावा लागला. या कठीण प्रसंगी बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी फार चांगले कार्य केले. चोख बंदोबस्त ठेवण्यापासून लोकांना मदत करण्यापर्यंतचे त्यांचे कार्य निश्चितच आर्दशवत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पोलिसांच्या हितासाठी राज्य शासन अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. राज्याच्या सर्व भागात पोलिसांसाठी 50 हजार नवीन निवासस्थाने बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलिसांना स्वमालकीचे घर मिळावे यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पोलिसांना वैयक्तिक घर खरेदीकरिता आतापर्यंत 208 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले असून यापेक्षा अधिक रक्कम अजून दिली जाईल. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील अग्रगण्य पोलीस दल आहे. आपण सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून याला जगातील उत्तम पोलीस दल बनविण्यासाठी कार्य करु, असे ते म्हणाले.

नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले की, गृह विभागाचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे मागील तीन वर्षात पोलिसांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पोलीस दल अधिक सक्षम बनत आहे. नागपुरातही पोलीस दलाच्या सक्षमीकरणातून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. पासपोर्ट पडताळणीचे सुलभीकरण, भरोसा सेल, अत्याधुनिक कंट्रोल रुम, पोलीस ड्युटी मीट सारखा उपक्रम, डिजीटल चार्जशीट, ट्राफिक क्लबसारखी संकल्पना राबविण्यात आली आहे. एका खाजगी सर्वेक्षणानुसार जनताही पोलीस दलाच्या प्रतिमेविषयी तसेच वागणुकीविषयी समाधान व्यक्त करीत असून त्यात 135 ते 157 टक्के सुधारणा झाल्याचे नमूद केले आहे, असे ते म्हणाले.

https://marathi.maharashtradesha.com/transform-maharashtra-inauguration-cm-devendra-fadnvis-iit-student/

जाहिरातीमध्ये मॉडेल न वापरता खरी माणसं, खरे लाभार्थी वापरले. – मुख्यमंत्री

साखर उद्योगासंबंधीचे सर्व परवाने, मान्यता ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!