Share

CM Eknath Shinde | “गोव्यावरुन एक जरी दारुची बाटली महाराष्ट्रात आणली तर…”, शिंदे सरकारचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गोवा वरुन महाराष्ट्र मध्ये मद्द आणण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशा तस्करांविरोधात वारंवार कारवाई करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच वाहनाचा पाठलाग करत किंवा तपासणीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मद्याच्या प्रमाणातही वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे सरकारने गंभीर इशारा दिला आहे. एवढंच नाही तर शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाला पाठवण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यास सांगितलं आहे.

कोल्हापूर येथे शंभुराज देसाई यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी कर्नाटक – महाराष्ट्र मार्गांवर कडक तपासणी सुरु करा आणि यासाठी तात्पुरते चेक नाके उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविल्यास त्यास मान्यता देण्यात येईल, अशा सूचना देसाईंनी दिल्या आहेत.

गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपॉइंट्स उभारण्यास सांगितलं आहे. कोरोना काळात अनेकजण गोव्यातून महाराष्ट्रात मद्य आणत होते. काहीजण अद्यापही ही तस्करी करत आहेत. दरामध्ये असणाऱ्या फरकामुळे भारतीय बनावटीच्या परदेशी दारुची तस्करी करण्याचं प्रमाण वाढत आहे, अशी माहिती कोल्हापूरमधील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!