Share

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्यामागील कारण , म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांची 153 वी जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसरकारने (State Government) एक नवीन आभियान राबण्याचा निर्णय घेतला असून, आता सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवरुन आता ‘हॅलो’ ऐवजी वंदे मातरम (Vande Mataram) या शब्दांनी अभिवादन करावे लागणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. मात्र, या मागचं कारण अनेकांना जाणून घेयचं होतं. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामागील कारण स्पष्ट केलं आहे.

आपल्याला पुन्हा एकदा वंदे मातरम् व्यवहारात आणायचा असल्याने हॅलो नाही तर वंदे मातरम् म्हणायचं, ही चळवळ, आता केवळ चळवळ नसून गुलामगिरीच्या सर्व साखळ्या तोडून काढायची आहे, असं फडणवीसांनी स्पष्टं केलं आहे.

वंदे मातरमची पार्श्वभूमी बाबत माहिती देताना, हा स्वातंत्र्याचा मुलमंत्र होता, बंगालची फाळणी झाली होती, त्यावेळी हजारो लोक उपस्थितीत होते, त्यावेळी लोकांची गर्दी होती, नेत्याची वाट पाहत होते, त्यावेळी एकाने वंदे मातरम् अशी घोषणा दिली. त्यानंतर सर्वच लोकांनी वंदे मातरम् ची घोषणा दिली आणि या घोषणेनंतर बंगालची फाळणी हाणून पाडली. त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिकांसाठी वंदे मातरम् हा मंत्र झाला. भगतसिंग फासावर गेले होते, त्यावेळी त्यांनी मातृभूमीचे नाव घेतले आणि वंदे मातरम् म्हणून याच भारतमातेच्या चरणी सेवा करण्यासाठी जन्म मिळावा अशी प्रार्थना केली होती, असा फडणवीसांनी सांगितलं आहे.

नियम जाणून घ्या:

1.विविध बैठका/सभांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करतांना ‘वंदे मातरम्’ या शब्दांनी करावी.
2.ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.
3.सर्व शासकीय कार्यालयांत दूरध्वनीवर / भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा अधिकारी / कर्मचारी यांनी संवाद साधल्यास सुरुवातीचे अभिवादन म्हणून ‘हॅलो’ संबोधन न वापरता, ‘वंदे मातरम्’ म्हणावे.
4.कार्यालय/संस्था येथे दूरध्वनीवरून होणाऱ्या संवादात सुरुवातीस ‘वंदे मातरम्’ हे संबोधन वापरले जाईल यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.
5.कार्यालयात/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यांगतांनाही सार्वजनिक जीवनात “वंदे मातरम्” ने संबोधन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.
6.शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालये, शासन सहाय्यित/ अनुदानित / अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा/ महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प/ उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांतही दूरध्वनीवर किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास, सुरुवातीला ‘हॅलो’ असे न म्हणता ‘वंदे मातरम्’ असे संबोधन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरही संवाद साधतांना ‘वंदे मातरम्’ असे संबोधन करावे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!