Share

Shivsena | शिवसेनेला पुन्हा पडणार मोठं खिंडार?, ‘इतके’ आमदार अन् खासदार शिंदे गटाच्या संपर्कात

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) पक्षाला मोठी खिंडार पडली. अशातच दसरा मेळावा वरून दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला आहे. यानंतर आता शिवसेनेला अजून एकदा धक्का भेटणार असल्याचं समोर येतं आहे. तसा दावा देखील प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केला आहे.

प्रतापराव जाधव यांचा दावा :

दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेतील अनेक खासदार आणि आमदार शिंदे घाटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांपैकी चार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, तसेच तीन खासदार देखील लवकरच शिंदे गटात एन्ट्री करणार आहेत, त्यामधील एक मुंबईचे खासदार असतील, असा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

गुलाबराव पाटलांचा दावा :

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी नुकतंच मिलिंद नार्वेकर देखील शिंदे गटात येणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे गटांमध्ये शिवसेना पक्षातील कोणत्या आमदारांची एन्ट्री होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया :

दरम्यान, मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असं काही करतील यावर कुणाचाच विश्वास नाही. कारण राज ठाकरे, नारायण राणे यांनी प्रचंड आरोप केले होते. त्यातूनही ते तावून सलाखून निघाले. आज ते तिरुपती सारख्या आध्यात्मिक संस्थेवर आहेत. त्यांची सद्बुद्धी नेहमीच चांगली असते. मात्र, आता ते शिंदे गटात जाणार की नाही याविषयी मला काहीही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी मिलींद नार्वेकर यांच्या शिंदे गटात जाण्यावर दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!