🕒 1 min read
पुणे : दोन दिवसांपूर्वी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर आहे, असं म्हणत अजित पवार यांच्यावर हल्ला केला होता.
काय म्हणाले अजित पवार ?
सत्तारांच्या याच वक्तव्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही, असं म्हणत अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पलटवार केला असल्याचं समजतं आहे.
अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. तसेच, अब्दुल सत्तारांच्या टीकेला राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना वेगळं बोलत होते. त्यानंतर ते शिवसेनेत गेले तेव्हा वेगळं बोलायचे.
ते काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही.त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना आम्ही महत्त्व देत नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या :
- Pune | मर्सिडिजच्या सीईओची कार पुण्याच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकली, गाडी सोडून ऑटो रिक्षाने केला प्रवास
- Sandipan Bhumre । “मंत्री करण्यासाठी शंकरवार गडखांकडून उद्धव ठाकरेंनी खोके घेतले”; संदीपान भुमरेंचा गंभीर आरोप
- Sandipan Bhumre । सत्ता यांच्या बापाची होती का?; संदीपान भुमरेंची ठाकरे गटावर जोरदार टीका
- Skin Care Tips | स्किन जळत असेल तर ‘हे’ उपाय करा, लगेच मिळेल आराम
- Ram Shinde । “मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण…”; राम शिंदेंनी रोहित पवारांना दिलं खुलं चॅलेंज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
