अनेक वेळा स्वयंपाक घरात काम करत असताना गरम वाफ किंवा गरम तेलाचा एखादा थेंब आपल्या हातावर किंवा स्कीन वर उडतो. किंवा एखाद्या वेळी चहा कॉफी किंवा दुधाचा अचानक एखादा गरम थेंब हातावर पडला तर स्किन जाळायला लागते. अशा परिस्थितीत आपण चिडचिड न करता, घाबरून न जाता पुढील उपाय करावे.
स्किन जळल्यावर काय करावे
थंड पाणी
जेव्हा तुमची स्किन भाजते/जळते तेव्हा घाबरून न जाता शांततेत त्या परिस्थितीला सामोरे जा. तुमच्या जवळपास कुठे पाण्याचा नळ असेल किंवा पाणी उपलब्ध असेल तर स्किनचा तो जळालेला किंवा भाजलेला भाग 10 मिनिट पाण्यात ठेवा. त्यामुळे तुम्हाला बर वाटेल. आणि जर बर्फ तिथे उपलब्ध असेल तर तुम्ही बर्फाचा उपयोग करू शकता.
कच्चा बटाटा
जळलेल्या किंवा भाजलेल्या जागेवर प्रथमोपचार म्हणून पाणी किंवा बर्फ लावा. त्यानंतर त्यावर कच्चा बटाटा स्वच्छ धुऊन कापून लावावा. भाजलेल्या किंवा जळालेल्या जागी कच्च्या बटाट्याला हलक्या हाताने चोळा. कच्च्या बटाट्याने त्या भाजलेल्या किंवा जळालेल्या जागेवर फोड येत नाही आणि जळजळ ही कमी होते.
मध
जळलेल्या किंवा भाजलेल्या जागेची जळजळ कमी होत नसेल तर त्यावर तुम्ही मध लावू शकता. मध लावल्याने त्या जळालेल्या जागी फोड येण्याची शक्यता कमी असते.
कोरफड
आपल्या घरात किंवा आजूबाजूला कोरफडीचे रोप असले तर आपण गोष्टींसाठी त्याचा उपयोग करू शकतो. जेव्हा तुमची स्किन भाजते किंवा जळते तर त्याची जळजळ शांत करण्यासाठी कोरफड हा रामबाण उपाय आहे. जळलेल्या किंवा भाजलेल्या जागेवर कोरफड लावल्यास काळे डाग सुद्धा पडत नाही.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | राजकारण कसं करायचं हे चंद्रकांत खैरेंना कळत नाही – संजय शिरसाट
- Eknath Shinde । एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेंना धक्का, युवासेनेची कार्यकारिणी केली जाहीर
- Sanjay Rathod | महंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया!
- Hair Tips | ‘या’ आयुर्वेदिक गोष्टी वापरून केस गळणे थांबू शकते, जाणून घ्या!
- Maruti Suzuki festive offer | मारुती आपल्या ‘या’ कार वर देत आहे भारी डिस्काउंट


