🕒 1 min read
Mumbai: राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल (दि. 29 सप्टेंबर) रोजी संध्याकाळी पुण्यासह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. राज्यात अनेक भागात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
सोमवारपर्यंत काही भागांत येल्लो अलर्ट
राज्यात कालपासून पावसाने थैमान घातले आहे. आणि हा पाऊस 5 ऑक्टोबर पर्यंत असाच सुरू राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर धुळे, नाशिक, पुणे, नगर, सातारा, औरंगाबाद, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या कल्याण मध्ये येल्लो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात परतीच्या पावसाची धुमाकूळ
पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात विविध भागात परतीच्या पावसाने जोरदार धरला आहे. देशात परतीच्या पावसाची चाहूल राजस्थानमध्ये लागली असली तरी राज्यात या पावसाने धुमाकूळ घातली आहे. मुंबईसह पुण्यामध्ये देखील या पावसाने थैमान घातले आहे. या अतिमुसळधार पावसामुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली असून नागरिकांची गैरसोय झाली आहे.
राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आली आहे. आणि त्याचबरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Navneet Rana | “…तेव्हा वाटत नाही की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत” ; नवनीत राणा यांची खोचक टीका
- Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये वाद? पूर्वेश सरनाईकांचं ट्विट चर्चेत
- Prajakta Mali | पुन्हा एकदा प्राजक्ता माळीच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव, ‘या’ पोस्टमुळे झाली ट्रोल
- Adipurush Poster Release | आदिपुरुष चित्रपटातील प्रभासची पाहिली झलक आली समोर
- Dry Skin | तुमचीही त्वचा कोरडी असेल तर ‘हे’ उपाय करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
