Share

Adipurush Poster Release | आदिपुरुष चित्रपटातील प्रभासची पाहिली झलक आली समोर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : साऊथ सुपरस्टार प्रभास आणि कृती सेनन हे सध्या त्यांच्या आदिपुरुष चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट गेले अनेक दिवस लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर पोस्टर रिलीज झाला असून या चित्रपटात सैफ अली खान आणि प्रभास चा जबरदस्त लूक पाहायला मिळणार आहे. या पोस्टर मध्ये प्रभास प्रभू श्रीराम यांच्या अवतारात दिसत आहे.

कधी होणार टीजर रिलीज

या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट बघत आहे. आणि आज चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट रामायणावर आधारित असल्याने निर्मात्यांनी त्याचा टीजर उत्तर भारतातील रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील सरायू नदीच्या काठावर 2 ऑक्टोबर रोजी सप्तमीला रिलीज करण्याचे ठरवले आहे.

काय आहे या चित्रपटामध्ये

आदिपुरुष चित्रपट रामायणापासून प्रेरित झालेला असून हा एक पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये प्रभास प्रभू श्रीरामचंद्राची भूमिका म्हणजेच आदिपुरुषाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये देवदत्त नागे यांनी हनुमानाची भूमिका साकारली असून सनी सिंगने लक्ष्मणाची भूमिका पार पडली आहे. बरोबर सैफ अली खान ने लंकापती रावणाची भूमिका साकारली आहे आणि कृती सेनन सीतामातेच्या भूमिकेत दिसणार आहे.

कधी होणार आदिपुरुष रिलीज

पोस्टर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. पुढच्या वर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट लोकांच्या भेटीस येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!