Share

Eknath Shinde | शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय अद्याप नाही – एकनाथ शिंदे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडी सरकार यांच्या काळात गोगरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. मात्र, ही योजना आता बंद करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय एकनाथ शिंदे-देवंद्र फडणवीस सरकारला आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडी सरकार यांच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगितीः

शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, मात्र, योजनेत गैरव्यवहार असल्याच्या तक्रारींवर चौकशी होईल असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाली आणि शिंदे-फडणवीस सरकार आली. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली. तर काही निर्णयांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

शिवभोजन थाळी बंद करण्यासाठी प्रस्तावः

दरम्यान, शिवभोजन थाळी बंद करण्यासाठी प्रस्ताव मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. मात्र, याबाबत शिंदे सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!