Share

Chandrakant Kaire | बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला खैरेंकडून नक्कल करत प्रत्युत्तर म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :  भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. अमित शहा आणि उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा आहे, त्यामुळे त्यांचं नाव घेऊन बोलू नये, असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला शिवसेना पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर देत बावनकुळेंवरही निशाणा साधाला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे ?

चंद्रकात खैरे यांनी औरंगाबादमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोतल होते. त्यांना पत्रकारांनी बावनकुळेंच्या टीकेवर सवाल केला. त्यावर सुरूवातीला चंद्रशेखर बावनकुळे कसे बोलतात याची खैरे यांनी नक्कल करून दाखवली. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायला बावनकुळे हे खूपच ज्युनियर आहेत, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी बावनकुळे यांना चांगलंच फटकारलं.

भाजपाची संध्याकाळ कधीही होऊ शकते –

उद्धव ठाकरेंना दिवा म्हटले तर अमित शहांना सूर्य म्हटलेत. सूर्य हा संध्याकाळी मावळतो. पण देवासमोरचा दिवा सलग ठेवला जातो. त्यामुळे दिवा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर भाजपाची संध्याकाळ कधीही होऊ शकते. त्यामुळे आता टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाची कामं करा, असा सल्लाही चंद्रकांत खैरे यांनी भाजप पक्षाला याठिकाणी दिला आहे.

शिवसेना कधीही संपणार नाही-

तसेच,शिवसेना पक्ष हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर अंशी सेना आल्यातरी शिवसेना कधीही संपत नाही, संपणार नाही. 1966 साली शिवसेना शिवरायांच्या आणि आई जगदंबेच्या आशिर्वादाने शिवसेना सुरू झाली असल्याचं खैरे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!