🕒 1 min read
नाशिक : राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार येथील माजी मंत्री माणिकराव गावित यांचं निधन झालं असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे काँग्रेसवर आज शोकांतिका पसरली आहे.
सलग 9 वेळा नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे खासदारः
52 वर्षे खासदारकी करत असताना माणिकराव गावित यांनी निभावलेली पक्षनिष्ठा आणि सर्व घटकांशी प्रेमभाव जपून मतदारसंघाशी बांधलेली घट्ट नाळ लक्षात घेता त्यांचे समर्थन करणारा भलामोठा कार्यकर्ता वर्ग आहे. माणिकराव सलग 9 वेळा नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे खासदार, दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री, लोकसभेचे हंगामी अध्यक्ष बनले होते.
माणिकराव गावित यांचं निधनः
माणिकराव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांनी आखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, उद्या सकाळी नवापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गावित यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. भरत गावित आणि निर्माला गावित असं त्यांचं नाव असून हे दोघेही राजकरणात आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | “मुख्यमंत्री दिल्लीच्या पातशाहच्या आदेशावरून निर्णय घेतात”
- Eknath Shinde | मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निर्धाराने प्रयत्न – एकनाथ शिंदे
- Girish Mahajan | “ठाकरे सरकारला वाईनसाठी बैठक घ्यायला वेळ मिळाला, मात्र प्रकल्पासाठी वेळ नव्हता”
- Eknath Shinde | वेदांता प्रकल्प गुजरातला कसा गेला?, एकनाथ शिंदे म्हणाले…
- Gulabrao Patil | “अजित पवारांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग आम्ही त्यांनाही गद्दार म्हणायचे का?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
